भारताचं G20 अध्यक्षपद हे सर्वसमावेशक, महत्त्वाकांक्षी, निर्णायक आणि कृती-केंद्रित असेल - शेर्पा अमिताभ कांत

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताचं G20 अध्यक्षपद हे सर्वसमावेशक, महत्त्वाकांक्षी, निर्णायक आणि कृती-केंद्रित असेल, असं G20 शेर्पा अमिताभ कांत यांनी म्हटलं आहे. भारताच्या अध्यक्षपदाचं सार हे "एक जग, एक कुटुंब आणि एक भविष्य" च्या कल्पनेमध्येही आढळू शकतं. त्यातून सामूहिक कार्य आणि एकत्रित उद्दिष्टांची आवश्यकता अधोरेखित होते, असं त्यांनी सांगितलं.

नोव्हेंबर 2022 आवृत्तीच्या "मन की बात" या पुस्तकात लिहिलेल्या  "द पाथ हेड: इंडिया अँड जी 20" या लेखात  अमिताभ कांत यांनी  हे भाष्य केलं आहे. जगाच्या जीडीपीमध्ये ८५ टक्के वाटा असलेल्या G20 चं अध्यक्षपद,  हे नेहमीच मोठं सन्मानाचं आणि मोठ्या जबाबदारीचं स्थान राहिलं आहे. 

आता पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय समुदायातील एक प्रमुख नैतिक शक्तीनं, जी 20 चं अध्यक्षपद स्विकारलं आहे.  भारत विकसित आणि विकसनशील राज्यांमध्ये वाढीव सहकार्यासाठी पूल म्हणून अग्रणी राहील, असं कांत यांनी सांगितलं.  

मिशन "लाइफ" -पर्यावरणासाठी जीवनशैली, SDG साठी वित्तपुरवठा, हरित ऊर्जा संक्रमण, अन्न सुरक्षा आणि अन्न आणि उर्जेसाठी विश्वसनीय पुरवठा साखळी निश्चित करणं आणि डिजिटल परिवर्तन हे G20 च्या अध्यक्षपदासाठी, भारताचं प्रमुख प्राधान्य  असेल, असं कांत यांनी नमूद केलं आहे.  भारताच्या प्रयत्नांचा गाभा,  सर्वसमावेशक वाढीची वचनबद्धता आणि या दशकातील  शाश्वत विकास उद्दिष्टं साध्य करण्यासाठी प्रगतीचा वेग वाढवणं आहे, असं त्यांनी सांगितलं. भारतानं अमृत कालमध्ये प्रवेश केला असून देशाच्या विकास आणि सामाजिक प्रगतीच्या परिवर्तनीय प्रवासानं अधोरेखित  केला आहे, असंही त्यांनी सांगितलं.