वस्तू आणि सेवा कर म्हणजे जीएसटीचं संकलन डिसेंबरमध्ये 1 लाख 49 हजार कोटी रुपयांवर

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) वस्तू आणि सेवा कर म्हणजे जीएसटीचं संकलन 2022 मधल्या डिसेंबर महिन्यात 1 लाख 49 हजार कोटी रुपये इतकं झालं आहे. 2021 च्या डिसेंबरच्या तुलनेत हे संकलन 15 टक्क्यांनी वाढल्याचं केंद्रीय अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे.

डिसेंबर 2022 मध्ये केंद्रीय जीएसटी 26 हजार 711 कोटी रुपये, राज्य जीएसटी 33 हजार 367 कोटी रुपये, इंटिग्रेटेड म्हणजे मिश्र जीएसटी 78 हजार 434 कोटी रुपये, तर सेस म्हणजे उपकर 11 हजार कोटी रुपये इतका जमा झाला आहे. या महिन्यात आयात केलेल्या वस्तूंमधून जमा झालेल्या महसुलात गेल्या वर्षीच्या तुलनेत 8 टक्के वाढ झाली आहे, तर देशांतर्गत व्यवहारातून जमा झालेल्या महसुलात 18 टक्के वाढ झाली आहे.