उत्तर प्रदेशातील जी-20 वॉकेथॉन शर्यतीला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनऊमध्ये दाखवला झेंडा


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेशातील चार शहरांमध्ये आज सकाळी जी-20 वॉकेथॉन शर्यत आयोजित केली होती. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनऊमध्ये झेंडा दाखवून या शर्यतीला सुरुवात केली. याचवेळी आग्रा, नोएडा आणि वाराणसी इथं इतर ज्येष्ठ मंत्री उपस्थित होते.

चारही शहरात आयोजित या शर्यतीत युवक, एनसीसी जवान, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. उत्तर प्रदेशात जी-20 शिखर संमेलनाशी संबंधित 11 बैठका होणार आहेत. राज्यात वाराणसी, लखनऊ, आग्रा आणि ग्रेटर नोएडा इथं जी-20 शी संबंधित कार्यक्रम आयोजित केले जातील.