‘स्पर्श’ कुष्ठरोग जनजागृती अभियान लोकसहभागाद्वारे यशस्वी करावे – आयुक्त धीरज कुमार

 

पुणे : सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत कुष्ठरोग निर्मुलनासाठी येत्या ३० जानेवारी ते १३ फेब्रुवारी या कालावधीत ‘स्पर्श’ कुष्ठरोग जनजागृती अभियान राबविण्यात येणार असून, ग्रामीण व दुर्गम भागातील लोकसहभाग वाढवून हे अभियान यशस्वी करावे, असे आवाहन आरोग्य सेवा आयुक्त धीरज कुमार यांनी आरोग्य भवन पुणे येथील माध्यम समितीच्या बैठकीत केले.

यावेळी राज्यातील कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाविषयीचे सादरीकरण धीरज कुमार यांच्यासमोर करण्यात आले., कुटुंब कल्याण व आरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, सहसंचालक डॉ. सुनिता गोल्हाईत, राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभागाचे उपसंचालक डॉ. कैलास बाविस्कर, सहायक संचालक डॉ. रामजी आडकेकर, रजनी वाघ तसेच विभागाचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते.

आयुक्त धीरज कुमार यांनी यावेळी राज्यातील कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाचा आढावा घेतला व विविध सूचना केल्या. राज्यातील ग्रामीण व दुर्गम भागात तसेच राज्यात कुष्ठरोगाचे रुग्ण जास्त असलेल्या जिल्ह्यांवर अधिक लक्ष देण्यात यावे. तपासणीसाठी स्वतःहून येणाऱ्या रुग्णांना प्रोत्साहन द्यावे आणि पाठींबा द्यावा. शालेय विद्यार्थ्यांची तपासणी करून त्यांचा या अभियानात अधिकाधिक सहभाग वाढवून त्यांना ‘आरोग्यदूत’ म्हणून प्रोत्साहन द्यावे. तळागाळात काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवावे, असे त्यांनी सांगितले.

‘कुष्ठरोगाविरुद्ध लढा देऊन, कुष्ठरोगाला इतिहास जमा करूया’ असे यावर्षी राबविण्यात येणाऱ्या ‘स्पर्श’ कुष्ठरोग जनजागृती अभियानाचे घोषवाक्य आहे. लोकसहभागातून हा कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन आयुक्तांनी केले. 

Popular posts
सफाई कामगारांच्या पाल्यांना वारसा हक्क नियमानुसार शासकीय सेवेत सामावून घेण्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image