परदेशातील भारतीय समुदायाची समूहशक्ती देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण ठरेल – राष्ट्रपती

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) परदेशातील भारतीय समुदायाची समूह शक्ती आणि क्षमता भारताच्या विकासात महत्त्वपूर्ण ठरेल असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे.इंदूरमध्ये आयोजित सतराव्या प्रवासी भारतीय दिन संमेलनाच्या समारोप सत्रात त्या काल बोलत होत्या.

परदेशी भारतीय कुटुंबातील प्रत्येक सदस्यानं भारताच्या विकास यात्रेत सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलं.या कार्यक्रमात राष्ट्रपतींच्या हस्ते 27 जणांना प्रवासी भारतीय दिन सन्मान प्रदान करण्यात आले.शिक्षण, कला, संस्कृती, व्यवसाय आणि सामाजिक कार्यात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल हा सन्मान करण्यात आला. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यावेळी उपस्थित होते. 

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image