ग्रेट ब्रिटन इथून करण्यात आलेल्या, खाजगी मालकीच्या व्हर्जिन ऑर्बिटचे पहिले अंतराळ प्रक्षेपण अयशस्वी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ग्रेट ब्रिटन येथुन करण्यात आलेल्य, खाजगी मालकीच्या व्हर्जिन ऑर्बिटचे पहिले अंतराळ प्रक्षेपण अयशस्वी झाले आहे . व्हॆजिन ऑरबीट नुसार  अहवालातील विसंगतीमुळे रॉकेटला आज पहाटेच्या सुमारास कक्षेत पोहोचण्यापासून रोखण्यात आले. पश्चिम युरोपमधून उपग्रह प्रक्षेपित करण्याचा हा पहिलाच प्रयत्न होता.

"कॉस्मिक गर्ल" नावाच्या व्हर्जिन अटलांटिक बोईंग 747 विमानाने दक्षिण-पश्चिम इंग्लंडमधील कॉर्नवॉल येथून उड्डाण केलं. अटलांटिक महासागरावर, आयर्लंडच्या दक्षिणेकडे उड्डाण करण्यासाठी सुमारे एक तासाच्या अंतराने रॉकेट सोडले. रॉकेटने नऊ छोटे उपग्रह सोडले आहेत. कॉर्नवॉलमधील टेकऑफचं दृश्य बघण्यासाठी सुमारे 2 हजार लोकांचा जमाव उपस्थित होता.