चंदा आणि दीपक कोचर यांना मुंबई उच्च न्यायालयानं तात्पुरता दिला दिलासा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) आयसीआयसीआय बँक घोटाळ्यातले आरोपी, बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना मुंबई उच्च न्यायालयानं तात्पुरता दिलासा दिला आहे. त्यांना अटक करण्याची कारवाई कायद्यानुसार नव्हती असं सांगून त्यांची प्रत्येकी एक लाख रुपयांच्या जामीनावर सुटका करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

नियमांना बगल देऊन व्हिडीओकॉन उद्योग समूहाला तीन हजार कोटी रुपयांचं कर्ज मंजूर केल्याच्या आरोपाखाली या दोघांना, आणि व्हिडीओकॉनचे संस्थापक वेणुगोपाल धूत यांना केंद्रीय अन्वेषण ब्यूरोने अलिकडेच अटक केली होती.