NCC-PM च्या प्रधानमंत्री वार्षिक मेळाव्याला, प्रधानमंत्री संबोधणार

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवी दिल्लीतील करिअप्पा संचलन मैदानावर होणाऱ्या NCC-PM अर्थात राष्ट्रीय छात्र सेनेच्या प्रधानमंत्री वार्षिक मेळाव्याला, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संध्याकाळी संबोधित करतील. यंदा एनसीसी आपल्या स्थापनेचं ७५ वं वर्षं साजरं करत आहे. एनसीसीनं ७५ वर्षांची यशस्वी कारकिर्द पूर्ण केल्याच्या स्मरणार्थ, या दिवसाचं वैशिष्ट्य म्हणून एक विशेष लिफाफा आणि ७५ रुपयांचं विशेष नाणं, प्रधानमंत्री यावेळी जारी करतील. या मेळाव्याचा कार्यक्रम दिवस-रात्र होणार आहे. त्यात, 'एक भारत-श्रेष्ठ भारत' या संकल्पनेवर आधारीत सांस्कृतिक कार्यक्रमाचाही समावेश असेल. वसुधैव कुटुंबकम या अस्सल भारतीय तत्त्वज्ञानाला अनुसरुन, १९ परदेशातील १९६ अधिकारी आणि कॅडेट्सना, या मेळाव्यासाठी आमंत्रित करण्यात आलं आहे.