सर्वंकष विकासाला प्राधान्य देणाऱ्या ७ क्षेत्रांवर केंद्रीत अमृत काळातला पहिला अर्थसंकल्प सादर

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वर्ष २०२३-२०२४ साठीचा अर्थसंकल्प आज लोकसभेत सादर केला. अर्थमंत्री या नात्यानं हा त्यांचा पाचवा अर्थसंकल्प असून अमृत काळातला पहिलाच अर्थसंकल्प आहे. सर्वंकष, सर्वांगीण विकास घडवणं, त्याचे फायदे तळागाळापर्यंत पोहोचवणं, पायाभूत विकास आणि गुंतवणुकीला चालना देणं, अंगभूत क्षमतांना वाव देणं, हरित विकास, युवाशक्तीला पोषक वातावरण देणं आणि वित्तीय क्षेत्राचं सुसंघटन या सात मार्गदर्शक उद्दिष्टांच्या आधारे यंदाचा अर्थसंकल्प तयार केला असल्याचं सीतारामन यांनी सांगितलं.