राज्यातल्या 17 कफ सिरप उत्पादक कंपन्यांवर कारवाई चालू असल्याचं सरकारचं विधानसभेत निवेदन

 


मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात १०८ कंपन्या कफ सिरपचं उत्पादन करतात त्यापैकी८४ उत्पादनांची तपासणी करण्यात आली आहे, त्यातले १७ नमुने त्रुटी ग्रस्त होते , पैकी ४ उत्पादकांची  उत्पादनं बंद करण्यात आली आहेत, ६ जणांचे परवाने निलंबित करण्याची कारवाई सुरू आहे, अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन खात्याचे मंत्री संजय राठोड यांनी विधानसभेत दिली, महाराष्ट्रातील एका कंपनीच्या दोष युक्त सिरप मुळे परदेशात ६६ मुलांचा बळी गेला आहे त्या कंपनीवर कारवाई करण्याची मागणी आशीष शेलार यांनी लक्षवेधी मध्ये केली होती.

पुन्हा यावर नव्याने तपासणी मोहीम राबवून कारवाई केली जाईल, अशी ग्वाही मंत्र्यांनी दिली. राज्यातील पतसंस्था मधील कर्ज वितरण प्रकरणी येत असलेल्या अडचणी आणि ठेवी सुरक्षित करण्यासाठी विम्याची व्यवस्था आदींसाठी येत्या पंधरा दिवसात एक विशेष तज्ञ समिती नेमण्याची तसंच अधिवेशन काळात यावर निर्णय घेऊ अशी घोषणा सहकार मंत्री अतुल सावे यांनी संबधित लक्षवेधी वर केली, प्रकाश आबिटकर यांनी ती उपस्थित केली होती, बाळासाहेब थोरात यांनी समिती नेमण्याची मागणी केली होती.

आरोग्य विभागात बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करू आणि मुंबई, पुणे आरोग्य विभागातल्या biometric वर सातत्याने देखरेख ठेवू, असं आश्वासन आरोग्यमंत्री डॉ तानाजी सावंत यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिले. संग्राम थोपटे यांनी आरोग्य खात्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावरच्या चर्चेदरम्यान ते बोलत होते. आरोग्य विभागातल्या वैद्यकीय अधिकाऱ्याची 983 रिक्त पदं भरण्याची प्रक्रिया सुरू असून महिनाभरात ती पूर्ण करू, असं सावंत म्हणाले.