बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेट करंडक मालिकेत ऑस्ट्रेलियाचा अंतिम फेरीत प्रवेश

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेट करंडक मालिकेतला भारताविरुद्धचा तिसरा सामना आज ऑस्ट्रेलियाने 9 गडी राखून जिंकला.  सामन्याच्या आजच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर उस्मान ख्वाजा आणि ट्रॅविस हेड खेळायला उतरले तेव्हा रविचंद्रन आश्विनने दुसऱ्याच चेंडूवर ख्वाजाला बाद करुन धक्का दिला. नंतर मार्नस लॅबुशेन आणि हेडर या जोडीने संयमाने खेळून विजयासाठी आवश्यक 76 धावा 18 षटकं आणि 5 चेंडूत पार केल्या. या डावात आठ गडी बाद करणारा नॅथॉन लायन सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. चार सामन्यांच्या मालिकेत भारत दोन - एकनं आघाडीवर आहे. मालिकेतला शेवटचा सामना येत्या नऊ तारखेपासून अहमदाबाद इथं सुरु होणार आहे.या सामन्यात 50 ची सरासरी राखून ऑस्ट्रेलियाने जागतिक कसोटी क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत थेट प्रवेश मिळवला आहे. 

Popular posts
वारकऱ्यांच्या सेवेसाठी जिल्हा प्रशासनाचे ‘आषाढी वारी २०२२’ ॲप
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरिता आरक्षण विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर
Image