H3N2 या विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यशासनाचा आरोग्य यंत्रणेला सतर्कतेचा इशारा

 


मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात H3N2 विषाणूची लागण होऊन दोन मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने आरोग्य यंत्रणेला सतर्कतेचा इशारा दिला आहे. नागपूर इथं एका जेष्ठ नागरिकाचा H3N2 ने मृत्यू झाला होता त्यानंतर काल अहमदनगर इथल्या एका वैद्यकिय विद्यार्थ्याचा H3N2 ने मृत्यू झाला.  राज्यात  H3N2 ने मृत्यू पावलेले  दोन्ही रुग्ण इतर आजारांनीही बाधित होते असं आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सांगीतलं. सध्या राज्यात साडेतीनशे रुग्णांच्या H3N2 विषाणू चाचण्या सकारात्मक आल्याचं त्यांनी नमूद केलं.  

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image