निगडीतील मातोश्री माथाडी कामगार सहकारी पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध

 

निवडणुकीवर कामगार नेते इरफानभाई सय्यद यांचेच वर्चस्व.. अध्यक्षपदी पांडुरंग कदम तर उपाध्यक्षपदी बबन काळे यांची निवड...

पिंपरी : निगडी, ट्रान्सपोर्टनगरच्या ' अ ' दर्जा प्राप्त मातोश्री माथाडी कामगार सहकारी पतसंस्थेची निवडणूक खेळीमेळीत पार पडली. महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष तथा कामगार नेते इरफानभाई सय्यद यांच्या नेतृत्वाखाली झालेली ही निवडणूक बिनविरोध झाली. निवडणूक निर्णय अधिकारी अनिता सावंत व जगदाळे यांनी निकाल घोषित केला. विजयी उमेदवारांनी गुलाल उधळून पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.  

दरम्यान सन २०२३ ते २०२८ या पंचवार्षिकीसाठी पदाधिकाऱ्यांच्या निवडी कऱण्यात आल्या. कामगार नेते इरफान सय्यद यांना मानणारा सभासद वर्ग अधिकचा असल्यामुळे पदाधिकारी निवडीतही त्यांच्याच गटाचे प्राबल्य दिसून आले. पतसंस्थेच्या अध्यक्षपदी पांडुरंग कदम, उपाध्यक्षपदी बबन काळे, सचिव ऊद्धव सरोदे, खजिनदार सर्जेराव कचरे, संचालक बाबासाहेब पोते, गोरक्षनाथ दुबाले, अशोक साळुंखे, समर्थ नाईकवाडे, विठ्ठल ईंगळे, ज्ञानदेव पाचपुते, चंद्रकांत पिंगट यांची बिनविरोध निवड करण्यात आली. 

याप्रसंगी इरफान सय्यद म्हणाले, कामगारांनी कामगारांच्या आर्थिक उन्नतीसाठी स्वतः उभे राहणे गरजेचे आहे. अनेक खाजगी बँका कामगारांना कर्ज देताना दुजाभाव करतात. कागपत्रांसाठी अडवणूक होते. त्यामुळे कर्जाअभावी कामगारांची फरफट होते. मात्र, आज सहकार क्रांतीमुळे माथाडी कामगारांच्या मदतीसाठी सहकारी पतसंस्था धावून येत आहेत. मातोश्री देखील त्याचेच एक उत्तम उदाहरण आहे. कामगारांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा तसेच उन्नतीसाठी कार्यरत आहे. तीचा कारभार माथाड़ी कामगारांच्या माध्यमातून चालवला जातो. गेल्या १९ वर्षापासून माथाडी कामगारांच्या गरजा भागविणारी शहरातील आदर्श पतसंस्था म्हणून तिला बहुमान मिळाला आहे, असे गौरवोदगार काढीत कार्यकारी मंडळाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

अध्यक्ष पांडुरंग कदम यांनी निवडणूक बिनविरोध व निर्विघ्नपणे पार पाडण्यात महत्वाची भूमिका निभावणारे महाराष्ट्र मजदूर संघटनेचे कार्याध्यक्ष परेश मोरे, भिवाजी वाटेकर, प्रविण जाधव, सतीश कंठाळे, नागेश व्हनवटे, पांडुरंग कालोखे, श्रीकांत मोरे, अमित पासलकर, चंदन वाघमारे, अक्षय शेलार,किशोर कोळेकर,कैलास तोडकर, रत्नाकर भोजने, व संघटनेचे सर्व पदाधिकारी, मुकादम व कामगारांचे विशेष आभार मानले. तसेच संस्थेची आर्थिक घौडदोड़ उत्तमरित्या चालवून सभासद आणि कामगार वर्गाच्या प्रगतीसाठी विविध योजना राबविण्याचा संकल्प केला.