अंतिम निर्णय होईपर्यंत औरंगाबादचं नाव न बदलण्याचे, मुंबई उच्च न्यायालयाचे सरकारी विभागांना निर्देश

 

मुंबई (वृत्तसंस्था) : नामांतराबाबत अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत सरकारी विभागांनी औरंगाबादचं नाव बदलू नये, असे निर्देश, मुंबई उच्च न्यायालयानं काल दिले. औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन शहरांची नावं बदलण्याच्या निर्णयाविरोधात, मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर काल सुनावणी झाली. न्यायमूर्ती एस व्ही गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती संदीप व्ही मारणे यांच्या पीठासमोर झालेल्या या सुनावणीत, दहा जूनपर्यंत टपाल कार्यालय, महसूल, पोलिस

ठाणे इत्यादी प्रशासकीय विभागांची नावं बदलण्याबाबत कोणताही निर्णय घेतला जाणार नाही, असं महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी खंडपीठाला सांगितलं. यासंदर्भात पुढची सुनावणी सात जून रोजी होणार आहे. 

Popular posts
वारकऱ्यांच्या सेवेसाठी जिल्हा प्रशासनाचे ‘आषाढी वारी २०२२’ ॲप
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरिता आरक्षण विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image