येत्या वर्षापासून नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्याची शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची घोषणा

 

मुंबई (वृत्तसंस्था) : येत्या वर्षापासून नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्यात येणार असल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी काल केली. काल पुण्यात याबाबत माहिती देताना ते म्हणाले की, ‘‘नवीन शैक्षणिक धोरण हे येत्या जूनमध्ये जे शैक्षणिक वर्ष चालु होईल तेव्हापासून त्याची अंमलबजावणी होतेय. आणि त्याच्यामध्ये आनंदाची गोष्ट अशी आहे की इंजिनिअरिंगचं शिक्षण याच्यापुढे मराठीमध्ये सुद्‌धा दिलं जाणार आहे. आणि त्याच्यामुळे मराठी शाळेमध्ये जात असलेल्या मुलांना ही एक दिलासा देणारी बातमी आहे. तांत्रिक शिक्षणसुद्‌धा मराठीमध्ये दिलं जाणार आहे. लवकरच मेडिकलचं शिक्षणसुद्‌धा मराठीमध्ये दिलं जाणार आहे. केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतामध्ये ही क्रांती घडतेय.’’