मुलींच्या १२ व्या युरोपियन गणितीय ऑलिम्पियाडमध्ये भारताला २ रौप्य आणि १ कांस्य पदकं, १ सन्मान्य उल्लेख
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली(वृत्तसंस्था): पोर्टोरोझ स्लोव्हेनिया इथं १३ ते १९ एप्रिल दरम्यान आयोजित मुलींच्या १२ व्या युरोपियन गणितीय ऑलिम्पियाडमध्ये, भारतानं उत्कृष्ट कामगिरी करत, २ रौप्य आणि १ कांस्य पदकं, तसंच १ सन्मान्य उल्लेख म्हणून गौरव मिळवला आहे. २०१५ पासून भारत या स्पर्धेत सहभागी होत आहे, तेव्हापासून भारतीय संघातल्या दोन सदस्यांनी रौप्य पदकं जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे.
हरियाणातल्या गुडगावमधली गुंजन अग्रवाल, आणि आसामच्या गुवाहाटीतली सुनैना पती या दोघींनी रौप्य पदकं पटकावली. तर, केरळमधल्या त्रिवेंद्रमच्या संजना फिलो चाकोला कांस्य पदक मिळालं. आंध्र प्रदेशच्या कडप्पामधल्या पोद्दातूरच्या भव्यश्री एन नागाला हॉनरेबल मेंशन म्हणून गौरवण्यात आलं. या संघाचं नेतृत्त्व पुण्यातल्या नवरोसजी वाडिया महाविद्यालयाच्या डॉ. आदिती फडके, आणि चेन्नई मॅथमेटिकल इंन्स्टिटयूटमधला बीएससीचा विद्यार्थी आणि इंटरनॅशनल मॅथमेटिकल ऑलिम्पियाड पदक विजेता, डेप्युटी लिडर रोहन गोयल यांनी केलं.
हा संघ उद्या मुंबईत येत असून होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रात संघाचा सत्कार केला जाणार आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.