अॅस्टर गार्डियन ग्लोबल नर्सिंग अर्वाड २०२३ साठी शांती तेरेसा आणि जिन्सी जेरी यांचा समावेश
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली(वृत्तसंस्था): परिचर्या कर्मचाऱ्यांसाठीच्या अॅस्टर गार्डियन ग्लोबल नर्सिंग अर्वाड २०२३ या जागतिक पुरस्कारासाठी नामनिर्दिशित झालेल्या, १० जणांच्या अंतिम यादीत अंदमान निकोबारमधे आदिवासी भागात काम करणाऱ्या शांती तेरेसा लॅक्रा आणि सध्या आयर्लंडमधे काम करणाऱ्या केरळच्या जिन्सी जेरी यांचा समावेश आहे. शांती तेरेसा पोर्ट ब्लेअरमधल्या जी बी पंत रुग्णालयात कार्यरत आहेत. अंदमान निकोबारमधल्या आदिवासी समुदायामधे भाषेच्या अडथळ्यावर मात करत, अनेक वर्षांच्या प्रयत्नांनी त्यांचा विश्वास जिंकून आवश्यक वैद्यकीय मदत पुरवण्याच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल २०११ मधे त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं.
जिन्सी जेरी यांनी दिल्लीच्या जमिया हमदर्द मधे परिचारिकेचं प्रशिक्षण घेतल्यानंतर २००६ साली त्या डब्लिंगला गेल्या. डब्लिंग रुग्णालयात मार्च २०२० मधे त्यांनी रोबोटिक यंत्रणा सुरु केली. त्यामुळे परिचारिकांच्या प्रशासकीय कामाचा ताण कमी झाला, मानवी चुका दूर झाल्या, त्यामुळे रुग्णांसाठी अधिक वेळ देणं त्यांना शक्य झालं. त्यांच्या या कामाबद्दल त्यांचं नामनिर्देशन झालं आहे. २०२ देशांमधून आलेल्या ५२ हजार प्रवेशिकांमधून लॅक्रा आणि झेरी यांची निवड झाली आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.