प्रसून जोशी यांच्या हस्ते सीबीएफसीच्या सुधारीत संकेतस्थळ आणि अँपचे उद्धाटन करण्यात आले
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली(वृत्तसंस्था): माहिती आणि प्रसारणमंत्रालयातंर्गत केंद्रीय फिल्म प्रमाणपत्र मंडळानं अलिकडेचं cbfcindia.gov.in हे सुधारित संकेतस्थळ आणि नवीन e-cine हे नवीन मोबाईल अँप चालू झाल्याची घोषणा केली. सीबीएफसीचे अध्यक्ष प्रसून जोशी यांच्याहस्ते या सुधारीत संकेतस्थळ आणि अँपचं उद्धाटन करण्यात आलं. कामकाजात अधिक पारदर्शकता आणि परिणामकारकता आणण्यासाठी आजची ही घोषणा म्हणजे २०१७ पासूनच्या डिजिटायझेशन प्रक्रियेचा महत्त्वाचा टप्पा असल्याचं जोशी यांनी सांगितलं. ते पुढं म्हणाले की, हे संकेतस्थळ आणि अँप उपयोग कर्त्यांना मैत्रीपूर्ण, मूल्यवान माहिती मिळवण्यासाठी उपयुक्त आणि अर्जदार तसंच सीबीएफसीच्या कर्मचाऱ्यांना काम करणं सोपं व्हावं, यासाठी आहे. या संकेतस्थळामधे चित्रपट प्रमाणपत्र, विविध कायदे-नियम, महत्त्वाच्या अधिसूचना, कोर्टाचे निर्णय तसंच प्रमाणीकृत चित्रपटांची सांख्यिकी माहिती उपलब्ध असून, अर्जदारांना संशोधन सोयसुद्धा उपलब्ध आहे. या वेबसाईटवरून दैनंदिन घडामोडी, कार्यक्रम बघता येतील.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.