कर्मचारी राज्य विमा योजनेत या वर्षी १७ लाख ८८ हजार नवीन कर्मचाऱ्यांची नोंद

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कर्मचारी राज्य विमा योजनेत या वर्षी एप्रिलमध्ये १७ लाख ८८ हजार नवीन कर्मचाऱ्यांची नोंद झाल्याचं कामगार आणि रोजगार मंत्रालयानं सांगितलं आहे. कर्मचारी राज्य विमा निगमनं अर्थात ESIC द्वारे जारी केलेल्या आकडेवारीनुसार,एप्रिल २०२३ मध्ये ३० हजाराहून अधिक नवीन आस्थापना नोंदणीकृत झाल्या असून तरुणांसाठी अधिक नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत. एप्रिलमध्ये  नोंदणी झालेल्या एकूण कर्मचाऱ्यांमध्ये २५ वर्षे वयापर्यंतच्या आठ लाख ३७ हजार कर्मचाऱ्यांची  तर  महिला सदस्यांची नोंदणी तीन लाख ५३ हजार इतकी  झाल्याचं  अकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. 

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image