शिंदे-फडणवीस सरकार जाहिरातींवर पाचशे कोटी रुपये खर्च करत असल्याचा काँग्रेसचा आरोप

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यावर पाच लाख कोटी रुपयांचा कर्ज असून शिंदे - फडणवीस सरकार हे फक्त जाहिरातींवर सुमारे पाचशे कोटी रुपयांचा खर्च करत असल्याचा आरोप, काँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे. ते काल हिंगोली इथं पक्ष कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. सध्याचं सरकार हे शेतकरी विरोधी असून, मराठवाड्याची अवस्था अतिशय बिकट झाली असल्याची टीका चव्हाण यांनी केली.