हुतात्मा चंद्रशेखर आजाद यांच्या जन्मस्थळाला मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट
• महेश आनंदा लोंढे
मुंबई : सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रशेखर आजाद नगर (भापरा) या हुतात्मा चंद्रशेखर आजाद यांच्या मध्य प्रदेशातील जन्मस्थळाला भेट दिली. “भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात ब्रिटिशांविरुद्ध तरुणांना एकत्र करुन क्रांतिकारक लढा देणाऱ्या आणि हौतात्म्य पत्करणाऱ्या चंद्रशेखर आजाद यांच्या स्वप्नातील सुराज्य साकारण्याची जबाबदारी आता आपली सर्वांची आहे”, अशा भावना यावेळी श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केल्या.
मंत्री श्री. मुनगंटीवार सध्या मध्य प्रदेश राज्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी अलिरजपूर जिल्ह्यातील आदिवासी बहुल भागातील भापरा (चंद्रशेखर आजाद नगर) येथील हुतात्मा चंद्रशेखर आजाद यांच्या जन्मस्थळाला स्थानिक लोकप्रतिनिधी-पदाधिकारी यांच्यासह सोमवारी भेट दिली. चंद्रशेखर आजाद यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर त्यांनी या स्मारकात असलेल्या चंद्रशेखर आजाद यांच्या जीवनावरील चित्र व छायाचित्र प्रदर्शनला भेट दिली.
हुतात्मा चंद्रशेखर आजाद यांच्या जन्मस्थळ स्मारकाच्या या भेटीच्या वेळी मध्यप्रदेश वनविकास महामंडळाचे अध्यक्ष माधोसिंग डावर यांच्यासह अलिराजपूर जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.