साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती योजनेसाठी ९ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 

मुंबई : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळमुंबई शहर-उपनगर जिल्ह्यात ‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती’ योजनेकरिता ९ जुलै २०२३ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन मुंबई शहर-उपनगरचे जिल्हा व्यवस्थापक अंगद कांबळे यांनी केले आहे.

मुंबई शहर-उपनगर जिल्ह्यातील मातंग समाज व तत्सम १२ पोटजातीतील विद्यार्थ्यांनी सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात शिक्षण घेतलेल्या व सन २०२३ मध्ये उत्तीर्ण झालेल्या इयत्ता १० वी१२ वीपदवीपदव्युत्तरवैद्यकीय व अभियांत्रिकी इ. करिता महामंडळाकडून सरासरी ६० टक्क्यांपेक्षा जास्त गुण असलेल्या विद्यार्थ्यांकडून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती‘ योजनेकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत.

                ज्येष्ठता व गुणानुक्रमांकानुसार प्रथम ३ ते ५ विद्यार्थ्यांची निधीच्या उपलब्धतेनुसार शिष्यवृत्ती वितरीत करण्यात येणार आहे. अभ्यासक्रमामध्ये विशेष प्राविण्याने गुणवत्ता मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी जातीचा दाखलारेशनकार्डआधार कार्डशाळेचा दाखलामार्कशीटदोन फोटोपुढील वर्गात प्रवेश घेतल्याचा पुरावा इ. सह दोन प्रतींमध्ये आपले पूर्ण पत्त्यासह व भ्रमणध्वनी क्रमांकासह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठेविकास महामंडळ (मर्या.)मुंबई – गृहनिर्माण भवनकलानगरतळमजलारुम नं. ३३बांद्रा (पू)मुंबई-४०००५१ या पत्त्यावर ९ जुलै२०२३ पर्यंत  अर्ज करावेत.

Popular posts
वारकऱ्यांच्या सेवेसाठी जिल्हा प्रशासनाचे ‘आषाढी वारी २०२२’ ॲप
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरिता आरक्षण विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर
Image