राष्ट्र उभारणीत मध्यमवर्गीयांच्या भूमिकेची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून प्रशंसा
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली(वृत्तसंस्था): राष्ट्र उभारणीत मध्यमवर्गीयांच्या भूमिकेची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे. विकास आणि नवनिर्मितीत वृद्धी घडवून आणण्यात मध्यमवर्ग आघाडीवर असून त्यांच्या कठोर मेहनतीतून नवभारताची प्रेरणा दिसून येत असल्याचं मोदी यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटलं आहे. मध्यवर्गीयांना जीवनसुलभता आणि लाभ मिळण्यासाठी सरकार सातत्यानं प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं.
गेल्या नऊ वर्षात व्याजदर कपात, प्राप्तीकरात विशेष अनुदान, चलन पुरवठा नियंत्रण आणि वस्तू आणि सेवा कराची प्रभावी अंमलबजावणी यासारख्या धोरणात्मक निर्णयांच्या माध्यमातून सरकारनं अनेक पावलं उचलल्याची माहिती त्यांनी दिली. या निर्णयामुळे मध्यमवर्गीयांच्या स्वायत्त उत्पन्न आणि बचतीत मोठी वाढ झाल्याचं प्रधानमंत्री म्हणाले. मध्यमवर्गीयांच्या आकडेवारीत २०१४ च्या तुलनेत २६ टक्क्यांवरून २०२३ मध्ये ३१ टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.