2000 रुपये मूल्याच्या चलनी नोटा मागे घेण्याच्या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निर्णयानंतर या नोटांबाबतची सद्यस्थिती

 

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने, आरबीआय कायदा, 1934 च्या कलम 24 (1) अन्वये, 10 नोव्हेंबर 2016 रोजी, 2000 रुपये मूल्याच्या चलनी नोटा व्यवहारात आणल्या होत्या. त्यावेळी, 1000 आणि 500 रुपये मूल्याच्या चलनी नोटा, व्यवहारातून बाद केल्यामुळे, चलनाची टंचाई निर्माण झाली होती, त्यामुळे त्या परिस्थितीवर त्वरित उपाययोजना म्हणून, 2000 रुपयांची नोट व्यवहारात आणली गेली. ही माहिती, केंद्रीय अर्थ राज्य मंत्री पंकज चौधरी यांनी आज राज्यसभेत एका लिखित प्रश्नाच्या उत्तरात दिली.

मंत्री म्हणाले की आरबीआयच्या 19.मे.2023 च्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे, (https://www.rbi.org.in/Scripts/BS_PressReleaseDisplay.aspx?prid=55707), असे जाहीर केले आहे की, 2000 रुपये मूल्याच्या पैकी 89% मूल्याच्या नोटा मार्च 2017 पूर्वी व्यवहारात आणल्या आहेत आणि त्यांच्या 4 ते 5 वर्षे आयुर्मान संपेपर्यंत या नोटा उपयुक्त आहेत.

आरबीआयने केलेल्या देशव्यापी सर्वेक्षणानुसार, आता व्यवहारांसाठी  2000 रुपये मूल्याच्या नोटांना प्राधान्य दिले जात नाही, असेही चौधरी यांनी सांगितले.  तसेच, इतर मूल्यांच्या नोटांचा साठा लोकांच्या चलनाची गरज भागवण्यासाठी पुरेसा आहे. वरील बाबी लक्षात घेऊन आणि आरबीआय च्या "क्लीन नोट पॉलिसी" च्या अनुषंगाने, आरबीआयने 2000 रुपये मूल्याच्या नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती मंत्र्यांनी दिली.

आरबीआय ने दिलेल्या अधिक माहितीनुसार, 2016 ते 2023 या वर्षांसाठी चलनात असलेल्या 2000 रुपये मूल्याच्या बँक नोटांचा दरवर्षी मार्च अखेरीस डेटा (खंड आणि मूल्य) खालीलप्रमाणे आहे:

Banknotes of ₹2000 denomination in Circulation since 2016

Year

Volume (crore pieces)

Value (₹ crore)

2016

-

-

2017

329

6,57,063

2018

336

6,72,642

2019

329

6,58,199

2020

274

5,47,952

2021

245

4,90,195

2022

214

4,28,394

2023

181

3,62,220

तसेच, चलनात असलेल्या 2000 रुपये मूल्याच्या बॅंक नोटांचे प्रमाण आणि मूल्य आणि 2000 रुपयांच्या चलनातील नोटा काढल्यानंतर चलनातून परत आलेल्या नोटांचा तपशील खालीलप्रमाणे आहे (आरबीआयच्या माहितीनुसार) :

₹2000 Denomination

Volume (crore pieces)

Value (in lakh crore)

Circulation as on May 19, 2023

177.93

3.56

Circulation as on June 30, 2023

41.80

0.84

Banknotes returned from Circulation

since May 19, 2023 till June 30, 2023

136.13

2.72

 

आरबीआय ने दिलेल्या आकडेवारीनुसार, शेड्युल्ड व्यावसायिक बँकांनी नोंदवलेल्या ‘एकूण ठेवी थकबाकी’ आणि ‘एकूण कर्ज आणि थकबाकीदार कर्जे’ ची आकडेवारी खालीलप्रमाणे आहे:

 

As on

Total Deposits outstanding

Gross Loans and Advances

outstanding

(Values)

(in Rs crore)

(Growth_YoY)

(in %)

(Values)

(in Rs crore)

(Growth_YoY)

(in %)

31 March, 2022

1,71,72,755

10.17

1,27,50,006

11.85

30 June, 2022

1,71,77,836

10.05

1,30,94,857

15.53

30 September, 2022

1,77,42,610

10.84

1,36,92,970

18.63

31 December, 2022

1,81,43,432

11.27

1,41,30,450

16.77

31 March, 2023

1,90,56,113

10.97

1,47,57,129

15.74

 

Popular posts
वारकऱ्यांच्या सेवेसाठी जिल्हा प्रशासनाचे ‘आषाढी वारी २०२२’ ॲप
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरिता आरक्षण विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर
Image