विधानसभेत कामगारांच्या मुद्यावर विरोधक आक्रमक

 

मुंबई (वृत्तसंस्था) : विधानसभेत कामगारांच्या मुद्यावर विरोधक आक्रमक झाले. कामगारांसाठी असलेल्या माध्यान्ह भोजन आणि घरासंदर्भातल्या योजनांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असून, चौकशी करण्याची मागणी काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी केली. कामगारांची नोंदणी करत असताना विशिष्ट मतदार संघांमध्येच होत असल्याचा आरोप त्यांनी केला. यासंदर्भात चौकशीचे आदेश देऊन अधिकार्यांवर कारवाई करण्याचं आश्वासन कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी दिलं.