देशात दारिद्रय रेषेखाली जीवन जगणाऱ्या लोकांची संख्या कमी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात दारिद्रय रेषेखाली जीवन जगणाऱ्या लोकांची संख्या कमी झाली आहे. निती आयोगानं आज राष्ट्रीय बहुआयामी गरिबी निर्देशांक जाहीर केला. त्यानुसार २०१५-१६ या वर्षी २४ पूर्णांक ८५ शतांश असलेली गरिबांची संख्या २०१९- २० या वर्षात १४ पूर्णांक ९६ शतांश टक्के झाली आहे. म्हणजे पाच वर्षांत १३ कोटी ५० लाख लोकांची दारिद्रयातून सुटका झाली. त्यानंतर नवी दिल्लीत निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी व्ही आर सुब्रमण्यम यांनी वार्ताहरांना ही माहिती दिली. २०३० पर्यंत शाश्वत विकासाचं निर्धारित उद्दिष्ट भारत वेळेपूर्वी कितीतरी आधी गाठेल असं त्यांनी सांगितलं. याच पाच वर्षांत ग्रामीण भागातली गरिबी ३२ पूर्णांक ५९ शतांश टक्क्यावरून कमी होऊन १९ पूर्णांक २८ शतांश टक्के होईल, असं अहवालात म्हटलं आहे.

Popular posts
सफाई कामगारांच्या पाल्यांना वारसा हक्क नियमानुसार शासकीय सेवेत सामावून घेण्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image