भारताची गेल्या महिन्यात अंदाजे ६० अब्ज ९ कोटी डॉलर्सची निर्यात

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारतानं गेल्या महिन्यात अंदाजे ६० अब्ज ९ कोटी डॉलर्सची निर्यात केली. एप्रिल ते जून या काळात व्यापारी तूट २८ पूर्णांक २६ शतांश टक्क्यानं कमी होऊन २२ अब्ज ५९ कोची डॉलर्सवर आली. गेल्यावर्षी एप्रिल ते जून या कालावधीत ही तूट ३१ अब्ज ४९ कोटी डॉलर्स इतकी होती. या एप्रिल ते जून या कालावधीत इलेक्ट्रानिक वस्तूंच्या निर्यातीत ४७ पूर्णांक १ दशांश टक्के इतकी वाढ झाली.

कृषी निर्यातीनंही यावेळी चांगली वाढ नोंदवली आहे. मसाल्यांच्या निर्यातीत १८ पूर्णांक २ शतांश, फळ आणि भाजीपाल्यांच्या निर्यातीत १४ पूर्णांक १ दशांश, तर तेलबियाच्या निर्यातीत २५ पूर्णांक १ दशांशची वाढ झाली आहे. औषध निर्यातीत ५ पूर्णांक १ दशांश वाढ झाली आहे. 

Popular posts
वारकऱ्यांच्या सेवेसाठी जिल्हा प्रशासनाचे ‘आषाढी वारी २०२२’ ॲप
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरिता आरक्षण विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर
Image