संवैधानिक मूल्यांच्या संवर्धनासाठी उच्च शिक्षणसंस्था हे चांगलं व्यासपीठ असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं अभ्यागत परिषदेत प्रतिपादन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) न्याय, समता, बंधुता, महिलांप्रति आदर अशा संवैधानिक मूल्यांचं संवर्धन करण्यासाठी उच्च शिक्षण देणाऱ्या संस्था हे चांगलं व्यासपीठ असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. राष्ट्रपती भवनात आयोजित अभ्यागत परिषदेचा समारोप करताना त्या आज बोलत होत्या. बौद्धिक संपदा निर्मिती करणाऱ्या तसंच बौद्धिक मालमत्ता हक्कांच्या मार्गानं महसूल मिळवून देणाऱ्या संस्थांचा उचित गौरव व्हायला हवा असं त्या म्हणाल्या. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणात सर्जनशीलता आणि नवोन्मेष यांच्यावर विशेष भर आहे असं त्यांनी सांगितलं. देशातली विद्यापीठं आणि उच्च शिक्षण संस्था हळू हळू स्टार्टअप उद्योगांना प्रोत्साहन देत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं.