राज्यात आतापर्यंत २० लाख ६० हजार हेक्टर क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या पूर्ण

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात आतापर्यंत २० लाख ६० हजार हेक्टर क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. आतापर्यंतच्या पेरण्यांचे हे प्रमाण अवघं १४ टक्के इतकं आहे. यंदा पाऊस उशीरा सुरू झाल्यानं आणि अद्यापही पेरण्यांसाठी पुरेसा पाऊस झाला नसल्यानं, खरीपाच्या पेरण्यांना उशीर झाला आहे. यामुळे मूग, उडीद, मटकी यासारखी कडधान्य पिकं शेतकऱ्यांच्या हातातून गेल्याची चर्चा आहे. 

राज्यातली दुष्काळ निवारण व्यवस्था, खरीपाच्या पेरण्यांची प्रगती आणि इतर कामांचा नुकताच आढावा घेण्यात आला. यासाठी केंद्र शासनातर्फे पुणे इथं एक बैठक घेण्यात आली. यात कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे सहसचिव, सॅम्युअल प्रवीण आणि राज्यातले कृषी आयुक्त सुनील चव्हाण हे उपस्थित होते. विविध केंद्र पुरस्कृत योजनांचा तसंच कृषीशी निगडीत विविध केंद्रीय विभागांच्या योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.