विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांचा शिवसेनेत प्रवेश

 

मुंबई (वृत्तसंस्था) : विधान परिषदेच्या उपसभापती आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या नीलम गोऱ्हे यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. मुंबईत विधानभवनातल्या पक्ष कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचं स्वागत केलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते. महिला विकास आणि इतर बाबतीत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना चांगलं काम करीत असल्यानं आपण त्यांच्यासोबत काम करायचा निर्णय घेतला, असं यावेळी गोऱ्हे यांनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राममंदिराचं स्वप्न पूर्ण होत असून केंद्र महाराष्ट्रासाठी भरपूर निधी देत आहे, त्यामुळे आपण भाजपाबरोबर राहणार असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं.