मणिपूर हिंसाचाराच्या मुद्यावर विरोधक चर्चा टाळत असल्याचा माहिती आणि प्रसारण मंत्र्यांचा आरोप

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मणिपूर हिंसाचाराच्या मुद्यावरुन विरोधक चर्चा टाळत असल्याचा आरोप माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी केला आहे. संसद भवन परिसरात आज ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यापूर्वीच सांगितलं आहे, तसंच देशाच्या इतर भागांमधेही असे प्रकार रोखले पाहिजेत, असंही प्रधानमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे, मात्र विरोधक आपली जबाबदारी टाळत आहेत असं ठाकूर म्हणाले. मणिपूर हिंसाचारा संबंधात सरकारची संसदेत चर्चा करण्याची तयारी आहे. मात्र विरोधी पक्ष केवळ कामकाजात अडथळे आणण्याच्या उद्देशाने नवनवीन मागण्या करत आहेत, असं संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितलं.