गुन्हे सिद्ध करण्याचा दर वाढवण्यासाठी नवीन निर्णय घेणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईतच्या पोलीस मुख्यालयात काल राज्यातल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची अर्धवार्षिक परिषद झाली, या परिषदेलाही मुख्यमंत्र्यांनी संबोधित केलं. ज्येष्ठ नागरिक, महिला आणि बालकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी यावेळी पोलीस प्रशासनाला दिले. गुन्हे सिद्ध करताना विविध अडचणी येतात. मात्र, शासन निर्णयाची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या परिषदेत बोलताना सांगितलं. या परिषदेतून मिळालेल्या सूचना, शासन निर्णयात करावयाच्या सुधारणा, प्रमाणित पद्धतीमध्ये करावयाच्या सुधारणा संदर्भातील सूचना यांचं एकत्रीकरण करून प्रस्ताव सादर करावा. त्यानुसार तातडीने नवीन निर्णय जारी करण्यात येईल, असंही फडणवीस यांनी सांगितलं.

अमली पदार्थ, सायबर गुन्हे या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी शासन सर्वसमावेशक व्यासपीठ तयार करत आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानासाठी मनुष्यबळ वाढविण्यात येईल, असंही फडणवीस म्हणाले. या कार्यक्रमात सर्वोत्तम पोलिस स्थानकं आणि अधिकाऱ्यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.मुंबईतच्या पोलीस मुख्यालयात काल राज्यातल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची अर्धवार्षिक परिषद झाली, या परिषदेलाही मुख्यमंत्र्यांनी संबोधित केलं. ज्येष्ठ नागरिक, महिला आणि बालकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी यावेळी पोलीस प्रशासनाला दिले. गुन्हे सिद्ध करताना विविध अडचणी येतात. मात्र, शासन निर्णयाची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या परिषदेत बोलताना सांगितलं. या परिषदेतून मिळालेल्या सूचना, शासन निर्णयात करावयाच्या सुधारणा, प्रमाणित पद्धतीमध्ये करावयाच्या सुधारणा संदर्भातील सूचना यांचं एकत्रीकरण करून प्रस्ताव सादर करावा. त्यानुसार तातडीने नवीन निर्णय जारी करण्यात येईल, असंही फडणवीस यांनी सांगितलं. अमली पदार्थ, सायबर गुन्हे या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी शासन सर्वसमावेशक व्यासपीठ  तयार करत आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानासाठी मनुष्यबळ वाढविण्यात येईल,असंही फडणवीस म्हणाले. या कार्यक्रमात सर्वोत्तम पोलिस ठाणी आणि अधिकाऱ्यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.