SSLV हे छोट्या उपग्रहांसाठीचं प्रक्षेपण यान खासगी क्षेत्राकडे सोपवण्याचा इसरोचा निर्णय

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) छोट्या उपग्रहांची मागणी लक्षात घेता, भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इसरोनं एस एस एल व्ही हे छोट्या उपग्रहांसाठीचं प्रक्षेपण यान खासगी क्षेत्राकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. निविदा काढून ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असं इसरोच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं. या यानाच्या निर्मितीसह त्याच्या संचलनाची जबाबदारीही खासगी क्षेत्राला दिली जाण्याची शक्यता या अधिकाऱ्यानं वर्तवली आहे. व्यावसायिक उपग्रह प्रक्षेपण सेवेच्या माध्यमातून भारताचा अंतराळ उद्योग २०२५ पर्यंत देशाच्या अर्थव्यवस्थेत १३ अब्ज अमेरिकी डॉलरचं योगदान देईल, असं एका अहवालात म्हटलं आहे.