कसिनो आणि ऑनलाइन गेमिंगवर ऑक्टोबरपासून 28 टक्के जीएसटी आकारण्यात येणार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कसिनो आणि ऑनलाइन गेमिंगवर आकारण्यात येणारा 28 टक्के वस्तू आणि सेवा कर त्यांच्या दर्शनी मूल्यावर आकारला जाईल असं केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल स्पष्ट केलं. वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी परिषदेच्या काल झालेल्या 51 व्या बैठकीनंतर त्या नवी दिल्लीत माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होत्या.

येत्या 1 ऑक्टोबरपासून हा कर लागू होईल, त्यानंतर सहा महिन्यांनी या कराच्या अंमलबजावणीबाबत आढावा घेण्यासाठी जीएसटी परिषदेची पुन्हा बैठक घेण्यात येईल असं सीतारामन यांनी सांगितलं. परिषदेनं याआधी झालेल्या बैठकीत कसिनो, अश्वशर्यती आणि ऑनलाइन गेमिंग यावर 28 टक्के कर आकारण्याची तसंच त्यासाठी कायद्यात आवश्यक सुधारणा करण्याची शिफारस केली होती.