महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

 

पुणे : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती मधील महार, नवबौद्ध, बुरूड, वाल्मिकी, मेहतर, खाटीक या समाजातील वंचित घटकातील नागरिकांसाठी राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळ नवी दिल्ली (एनएसएफडीसी) यांच्या विविध कर्ज योजना ऑनलाईन सुरु करण्यात आल्या आहेत.

राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळाच्या सर्व योजना व राज्य शासनाच्या अनुदान बीज भांडवल प्रशिक्षणासाठी अर्जदारांनी एनबीआर पोर्टलवरून अर्ज करावेत. तसेच राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त व विकास महामंडळ नवी दिल्ली (एनएसकेएफडीसी) यांच्या योजनेसाठी https://mpbcdc.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अर्जदारांना अर्ज करता येतील.

एनएसकेएफडीसी यांच्या अंतर्गत शैक्षणिक कर्जासाठी अर्जदारांनी नवयुग बेनीफिशरी रजिस्ट्रेशन (एनबीआर) पोर्टल https://nbrmahapreit.in या संकेतस्थळावर अर्ज करावेत.

अधिक माहितीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सर्वे नं.१०३/१०४, मेंटल कॉर्नर, विश्रांतवाडी पोलीस स्टेशन समोर, येरवडा, पुणे – ४११०१५, दूरध्वनी क्रमांक ०२०-२९७०३०५८ वर संपर्क साधावा, असे आवाहन महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एम. एम. माने यांनी केले आहे.

Popular posts
वारकऱ्यांच्या सेवेसाठी जिल्हा प्रशासनाचे ‘आषाढी वारी २०२२’ ॲप
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरिता आरक्षण विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर
Image