राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांनी घेतली सर्वपक्षीय बैठक

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांनी आज संसदेतल्या त्यांच्या दालनात सर्वपक्षीय बैठक घेतली. राज्यसभेचं कामकाज सुरळीत चालवण्याच्या दृष्टीने मार्ग काढण्यासाठी ही बैठक होती. सभागृह  आणि भाजपा नेते पियुष गोयल,काँग्रेस नेते जयराम रमेश आणि प्रमोद तिवारी, बीआरएसचे केशव राव, डीएमकेचे तिरुची शिवा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या प्रियांका चतुर्वेदी, सीपीआयचे विनॉय विश्वम, एजीपीचे बिरेंद्र प्रसाद बैश्य, आरएलडीचे जयंत चौधरी आणि तृणमूलचे शुक्लेंदू शेखर रॉय हे सर्वजण या बैठकीला हजर होते.