आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत यंदाही 'हर घर तिरंगा' मोहिम राबविण्यात येणार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत यंदाही 'हर घर तिरंगा' मोहिम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक टपाल कार्यालयात 25 रुपये किंमतीमध्ये कापडी ध्वज उपलब्ध असल्याची माहिती पुणे ग्रामीण डाक विभागाचे अधिक्षक बी.पी.एरंडे यांनी दिली. नागरिकांनी तिरंगा ध्वज विकत घेऊन आपल्या घरावर 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान फडकवावा असं आवाहन पुणे ग्रामीण टपाल विभागानं केलं आहे.