चांद्रयान ३ चं विक्रम लँडर आज पुन्हा यशस्वीरित्या चंद्राच्या पृष्ठभागावर अलगद उतरलं
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली(वृत्तसंस्था): चांद्रयान ३ चं विक्रम लँडर आज पुन्हा यशस्वीरित्या अलगदपणे चंद्रावर उतरलं. या लँडरचं इंजिन आज पुन्हा प्रज्वलित झालं, त्यानंतर चंद्राच्या पृष्ठभागापासून सुमारे ४० सेटींमीटर वरपर्यंत जाऊन या ठिकाणाहून ३०-४० सेटींमीटरच्या अंतरावर हे लँडर अलगदरित्या सुखरुप उतरलं. त्यानंतर यावरची सर्व उपकरणं नियमितपणे कार्यरत आहेत. चांद्रयान ३ मोहिमेत निश्चित उद्दिष्टांच्या पलीकडची ही कामगिरी आहे. यामुळं भविष्यात चंद्रावर पाठवलेलं यान पुन्हा पृथ्वीवर आणायला आणि मानवी मोहिम पाठवयाला मदत होणार आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.