पुणे बालेवाडी इथल्या शिवछत्रपती क्रीडा संकुलात तिसऱ्या अखिल भारतीय राजभाषा परिषदेचं उद्घाटन

 

पुणे : पुण्याजवळ बालेवाडी इथल्या शिवछत्रपती क्रीडा संकुलात आज तिसऱ्या अखिल भारतीय राजभाषा परिषदेचं उद्घाटन झालं. या दोन दिवसीय परिषदेत देशभरातून हिंदी भाषेचे जाणकार आणि अभ्यासकांसह सुमारे सात हजार प्रतिनिधी सहभागी होत आहेत. राजभाषा २०४७: विकसित भारताचा भाषिक परिप्रेक्ष्य, हिंदी भाषेच्या विकासामध्ये माध्यमांची भूमिका, भारतीय सिनेमा, या आणि अन्य विषयांवर यावेळी चर्चा होईल. या परिषदेत, ‘हिंदी शब्दसिंधू’हा तीन लाख ५१ हजार शब्दांचा शब्दकोश आणि ई-ऑफिस अॅपचं उदघाटन केलं जाईल.