शेतकरी हक्कांबाबतच्या पहिल्या जागतिक परिषदेचं राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज नवी दिल्ली इथं शेतकरी हक्कांबाबतच्या पहिल्या जागतिक परिषदेचं उदघाटन केलं. जगातल्या ५९ देशांमधले विख्यात शास्त्रज्ञ, शेतकरी आणि कृषी तज्ज्ञ या परिषदेत सहभागी झाले आहेत. आंतरराष्ट्रीय कराराच्या कलम-९ मध्ये नमूद केलेल्या, वनस्पतींच्या प्रजातींशी निगडित शेतकऱ्यांच्या हक्कांबाबतच्या  प्रमुख  मुद्द्यांवर यावेळी चर्चा होईल. शेतकरी हक्क कायदा, २००१ अंतर्गत वनस्पतींच्या विविध प्रजातींची नोंद करून, त्याच्याशी निगडित शेतकऱ्यांच्या हक्कांचा समावेश करणारा भारत हा जगातला पहिलाच देश आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत.