जनतेला आरोग्य सुविधा तातडीने पुरविता याव्यात यासाठी आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत यांच्या हस्ते ४६ वाहनांचे हस्तांतरण

 

पुणे : जनतेला आरोग्य सुविधा तातडीने पुरविता याव्यात यासाठी खरेदी करण्यात आलेल्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिनस्त क्षेत्रीय अधिकाऱ्यांसाठी ४६ वाहनांचे हस्तांतरण विधानभवन येथे सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विभागीय उपायुक्त वर्षा ऊंटवाल-लड्डा, रामचंद्र शिंदे, उपसंचालक कैलास कराळे, आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

आयुक्त, आरोग्य सेवा अंतर्गत राज्यस्तरीय, विभागस्तरीय व जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांच्या पर्यवेक्षकीय कामकाज सुरळीत पार पाडता यावे यासाठी वाहन खरेदीकरिता ३ कोटी ६८ लाख रुपये इतक्या खर्चास शासनाने मंजुरी दिली होती. राज्यातील ५ उपसंचालक, ११ सहायक संचालक, १४ जिल्हा आरोग्य अधिकारी व १६ जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या कार्यालयाला ही वाहने हस्तांतरीत करण्यात आली आहेत.

Popular posts
वारकऱ्यांच्या सेवेसाठी जिल्हा प्रशासनाचे ‘आषाढी वारी २०२२’ ॲप
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरिता आरक्षण विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image