अशियाई स्पर्धेत शंभरपेक्षा अधिक पदकं पटकावणाऱ्या भारतीय एथलेटिक चमूचं प्रधानमंत्र्यांनी केलं अभिनंदन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) अशियाई स्पर्धेत शंभरपेक्षा अधिक पदकं पटकावणाऱ्या भारतीय एथलेटिक चमूचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे. समाजमध्यमावर प्रसारित केलेल्या आपल्या संदेशात त्यांनी म्हटलं आहे की भारतासाठी ही एक अविस्मरणीय कामगिरी आहे. १०० पदकं मिळवल्याबद्दल संपूर्ण देशचं रोमांचित झाला आहे. क्रिडा आणि माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकुर यांनीही भारतीय एथलेटिक चमूचं अभिनंदन केलं आहे. आज नवी दिल्लीत प्रसार माध्यमांशी बोलतांना ते म्हणाले की हे सारे खेळाडू भविष्यातल्या खेळांडूंसाठी प्रेरणास्थान आहेत. यंदाच्या अशियाई खेळांमध्ये भारतीय खेळाडूंनी अनेक जागतिक विक्रम मोडीत काढून नवे अशियाई विक्रम प्रस्थापित केल्याचंही ते म्हणाले.