ओबीसी जनगणनेच्या मागणीला विरोध नसल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांचं स्पष्टीकरण

 


मुंबई (वृत्तसंस्था) : ओबीसी जनगणनेच्या मागणीला विरोध नसल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे. ते आज नागपुरात बातमीदारांशी बोलत होते. ही जनगणना कशी करावी हे ठरवावं लागेल, याच संदर्भानं बिहारमध्ये जनगणना झाल्यानंतर जशी परिस्थिती निर्माण झाली तशी आपल्याकडे होऊ नये, याची काळजी घ्यावी लागेल, त्यानुसारच राज्य सरकार योग्य निर्णय घेईल असं ते म्हणाले. मागासवर्ग आयोगातल्या रिक्त जागा भरण्याची कार्यवाही लवकरच पूर्ण केली जाईल असंही त्यांनी सांगितलं.आपल्या सरकारला मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर टिकणारं आरक्षण द्यायचं आहे, तशी भूमिकाही मुख्यमंत्र्यांनी मांडली असून, आम्ही सगळेच त्या भूमिकेच्या पाठिशी आहोत, त्यामुळे घाईत निर्णय घेतला जाणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.