लाच मागितल्या प्रकरणी सेन्सॉर बोर्डाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसह तिघांविरोधात सीबीआयकडून गुन्हा दाखल
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली(वृत्तसंस्था): चित्रपट प्रदर्शनासाठी आवश्यक प्रमाणपत्र देण्याकरता लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयनं काही जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यात ३ व्यक्ती आणि CBFC, अर्थात केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाच्या काही अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. हिंदीत डब करण्यात आलेल्या एका चित्रपटाला सप्टेंबर २०२३ मध्ये सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ७ लाख रुपयांची लाच स्वीकारल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याप्रकरणी मुंबईसह ४ ठिकाणी सीबीआयनं छापे टाकले असून काही कागदपत्र गोळा केली आहेत.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.