लातूर जिल्ह्यातील एसटी वाहतूक पूर्ववत

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झालेल्या मराठा आंदोलकांमुळे लातूर जिल्ह्यात गेले पाच दिवस बंद असलेली एसटीची वाहतूक आज पूर्ववत सुरू झाली. सुरक्षेच्या कारणास्तव लातूर, अहमदपूर, निलंगा, उदगीर आणि औसा आगारांमधून एकही बस बाहेर पडल्या नव्हत्या. त्यामुळे दररोजच्या अडीच हजार फेऱ्यातून दिवसाला मिळणारं जवळपास ५० लाख रुपयांचं उत्पन्न बंद झालं होतं. त्यामुळे एसटी ला पाच दिवसांत सुमारे अडीच कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला.