मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून ज्येष्ठ वकील सोमशेखर सुंदरेशन यांचा शपथविधी

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून ज्येष्ठ वकील सोमशेखर सुंदरेशन यांचा शपथविधी आज झाला. मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती डी.के. उपाध्याय यांनी त्यांना पदाची शपथ दिली. या नियुक्तीबरोबर  मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या आता ६९ झाली आहे. न्यायालयात एकंदर ९४ न्यायाधीशांची पदं मंजूर आहेत.