शेतकरी, शेतमजूर आणि कामगार यांच्याकडे लक्ष दिलं जात नाही, असं मेधा पाटकर यांचं मत

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) व्यवस्थेमुळे शेतकरी,शेतमजूर,आणि कामगार नागवला जात आहे,त्याकडे लक्ष दिलं जात नाही,असं नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी म्हटलं आहे.त्या सोलापूरमधे वार्ताहर परिषदेत बोलत होत्या. शेतकऱ्यांसाठी किमान हमी भाव कायदा अजून मंजूर केलेला नाही, केंद्र सरकारनं एकूण ४३ कायदे मागं घेण्याचं जाहीर केलं, पण २९ कायदे अद्याप मागं घेतलेले नाहीत.असं त्या म्हणाल्या.जल, जमीन, जंगल या तीन घटकांचं शोषण होत असल्यानं भूकंप,दुष्काळासारख्या नैसर्गिक आपत्ती वाढताहेत.आम्ही हे सांगतोय म्हणून आम्हाला विरोध करण्यापेक्षा निसर्गाच्या हानीचा अनुभव समजून घ्यायला हवा,असंही त्या म्हणाल्या.मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन खरं आहे,पण आरक्षणाचे निर्णय न्यायालयात टिकायला हवेत,असं मत त्यांनी व्यक्त केलं.