ऑक्टोबर महिन्यात १ लाख ७२ हजार कोटींहून अधिक वस्तू आणि सेवा कर जमा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ऑक्टोबर महिन्यात १ लाख ७२ हजार कोटींहून अधिक वस्तू आणि सेवा कर जमा झाल्याची माहिती अर्थ मंत्रालयानं दिली आहे. गेल्या वर्षाच्या ऑक्टोबर महिन्यात  जमा झालेल्या जीएसटीच्या रकमेपेक्षा ही रक्कम १३ टक्के अधिक असल्याचंही मंत्रालयानं म्हटलं आहे. जमा जीएसटी रकमेमध्ये ३० हजार ६२ कोटी रुपये केंद्रिय जीएसटी तर ३८ हजार १७१ कोटी रुपये राज्य जीएसटी आहे. एकात्मिक वस्तू आणि सेवाकरापोटी ९१ हजार ३१५ कोटी रुपये तर १२ हजार कोटी रुपये सेस जमा झाला आहे.