कर्जदारांना कर्जमाफीची भुरळ घालून दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना जनतेने बळी पडू नये असं रिझर्व बँकेचं आवाहन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कर्जदारांना कर्जमाफीची भुरळ घालून त्यांची दिशाभूल करणाऱ्या काही जाहिराती रिझर्व्ह बँकेच्या निदर्शनास आल्या आहेत. समाज माध्यमांवर अशा अनेक जाहिरातींचा प्रसार होत असून अशा संस्था कोणत्याही अधिकाराशिवाय कर्जमाफी प्रमाणपत्रे जारी करण्यासाठी सेवा शुल्क आकारत आहेत.अशा खोट्या आणि दिशाभूल करणार्‍या जाहिरातींना  जनतेने बळी पडू नये असं आवाहन रिझर्व्ह बँकेनं केलं आहे.