साडीची विविध रुपं दर्शवणाऱ्या एक भारत साडी वॉकेथॉनचं मुंबईत आयोजन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारतातल्या हातमाग साडी संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी वस्त्रोद्योग मंत्रालयानं आज मुंबईत ‘वन भारत सारी वॉकेथॉन’चे आयोजन केलं होतं. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधल्या एमएमआरडीसी ग्राऊंड इथं पाच हजारहून अधिक महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत नारी शक्तीचे दर्शन घडवले.

पैठणी, पोचमल्ली, भागलपुरी, बनारसी, पश्मिना, पटोला, महेश्वरी या आणि भारतातल्या वेगवेगळ्या राज्यातल्या अनेक प्रसिद्ध साड्यांचे प्रतिनिधीत्व या महिलांच्या पेहरावातून दिसून येत होते. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी या वॉकेथॉला हिरवा झेंडा दाखवला.

यापूर्वी गुजरातमधे सुरत इथं सारी वॉकेथॉनचं आयोजन करण्यात आले होते. वस्त्रोद्योग राज्यमंत्री दर्शना जरदोष आणि खासदार पूनम महाजन यांनी या वॉकेथॉनचे आयोजन केले होते.